भूमी अभिलेखचे २ मार्चपासून काम बंद आंदोलन

भूमी अभिलेखचे २ मार्चपासून काम बंद आंदोलन
Published on

- rat१८p७.jpg-
२६O२५३७०
लांजा : भूमिअभिलेख कार्यालयातील आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी.
-----
भूमीअभिलेखचे २ मार्चपासून कामबंद आंदोलन
लांज्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग; २० पासून मोजणी बंद
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १८ ः भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये लांजा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. सध्या काळ्या फिती आंदोलन करण्यात आले असून, २० पासून मोजणी कामबंद ठेवले जाणार आहे. याची दखल घेतली नाही तर २ मार्चपासून संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
भूमिअभिलेख कर्मचारी कृती समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील जमाबंदी आयुक्तांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतनश्रेणी लागू केलेली नाही. महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते; मात्र, दीडशे दिवसांचा कालावधी झाला तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे संघटनेने मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या आंदोलनात लांजा भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार देवाशीष सुवरे, भूकरमापक तुषार कदम, परिरक्षण भूमापक काशिनाथ कुमठेकर, भूकरमापक शुभम कुरळपकर, निमतानदार शीतल कांबळे, भूकरमापक संकेत सणस, अभिलेखपाल कीर्ती नार्वेकर, परिरक्षण भूमापक सुशील तळेकर, कनिष्ठ लिपिक प्रतिभा कचरे आणि शिपाई संदीप पोमेंडकर आदी सहभागी होणार आहेत.
----
...आंदोलनाचे टप्पे!
२० फेब्रुवारीपासून मोजणी कामबंद ठेवून काळ्या फिती लावून फक्त कार्यालयीन कामकाज केले जाईल. २३ ते २६ फेब्रुवारी या काळात सामूहिक रजा आंदोलन करतील तर २७ ला जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित करून धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com