प्रलंबित विकासकामांचा वर्षात निपटारा
25415
प्रलंबित विकासकामांचा वर्षात निपटारा
मनीष दळवी ः होडावडा-मातोंड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः मातोंड व होडावडा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. दोन्ही गावांतील ग्रामस्थांची वारंवार मागणी होती. या रस्त्याला आज पहिल्या टप्प्यात ३० लाख निधी मंजूर झाला असून पुढील टप्प्यात ३० लाख निधी देणार आहे. याच रस्त्यावर असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असून पुढील वर्षभरात या भागातील विकासकामांबाबत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी होडावडा येथे दिली.
तालुक्यातील मातोंड व होडावडा या दोन गावांना जोडणाऱ्या व अतिशय खराब झालेल्या रस्त्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजनेतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामाचे भूमिपूजन दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, मातोंड उपसरपंच आनंद परब, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, मच्छीमार नेते वसंत तांडेल, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष सावंत, संजय केणी, शिवसेनेचे रवी केळुसकर, अण्णा वजराटकर, तुकाराम कोंडये, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, सुजाता सावंत, दीपेश परब, होडावडा ग्रामपंचायत सदस्य अनन्या धावडे, हर्षल परब, नंदा घाडी, काका सावंत, श्रीकांत परब, शेखर परब यांच्यासहित महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---
कोट्यवधीचा निधी मंजूर
श्री. दळवी म्हणाले, ‘‘या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला आज प्रारंभ होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या भागात मंजूर झाला आहे. आता याची प्रत्यक्ष कामे सुरू होतील. विकासकामांच्या संदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न वर्षभरात मार्गी लागतील. यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या तालुक्यातील कानाकोपऱ्यात विकासनिधी पोहोचवणे आणि विकासात्मक बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’
या पंचक्रोशीतील सर्वच विकासात्मक प्रश्न मार्गी लावल्याबाबत काका सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

