बांदा उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे

बांदा उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे

Published on

25432

बांदा उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे

बिनविरोध वर्णी ः पक्षीय धोरणानुसार निवड

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा पक्षीय धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, राजाराम उर्फ बाळू सावंत, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी आदम शहा आदी उपस्थित होते. आगलावे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, भाजप प्रभारी मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, महिला शहराध्यक्ष भाजप स्मिता पेडणेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण आकेरकर, नीलेश नाटेकर, शैलेश केसरकर, अपर्णा आगलावे, वर्षा आगलावे, सौरभ आगलावे, साहिल आगलावे, मनोज सावंत, नारायण गावडे, नाना सावंत, भाई म्हाडगुत, दर्पण आळवे, सिद्धेश महाजन, माधवी गाड, शुभम कवठणकर, सुनील धामापूरकर, बाळा पेडणेकर, हेमंत मोर्ये, रीना आगलावे, वालेतीन आल्मेडा, केदार कणबर्गी आदी उपस्थित होते.
...................
कोट
उपसरपंचपदी निवड करून ग्रामस्थांनी व सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. ही जबाबदारी केवळ पदाची नाही तर गावाच्या विकासासाठी सेवा करण्याची मोठी संधी आहे. सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती, तसेच मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल. बांदा गावाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम लाभावे, हीच अपेक्षा आहे.
- रत्नाकर आगलावे, उपसरपंच, बांदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com