सावंतवाडी येथे आज 
निमंत्रित भजन स्पर्धा

सावंतवाडी येथे आज निमंत्रित भजन स्पर्धा

Published on

सावंतवाडी येथे आज
निमंत्रित भजन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः सावंतवाडी तालुका ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे उद्या (ता. १९) येथील श्री देव नारायण मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी ५.३० ते ११ वाजेपर्यंत निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रिक्षा संघटनेचे यावर्षीचे २८ वे वर्ष आहे. ​स्पर्धेचे उद्‍घाटन सायंकाळी ५.३० वाजता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेवक संजू परब, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सीताराम गावडे, नगरसेविका स्नेहा नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. ​सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी १२.३० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, ५.३० वाजता निमंत्रित भजन स्पर्धा, त्यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. ​या स्पर्धेत ​सायंकाळी ५.३० वाजता संत गोरा कुंभार प्रासादिक भजन मंडळ कोलगाव, ​६.३० वाजता मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ मळेवाड, ​७.१५ वाजता दिर्बादेवी प्रासादिक महिला भजन मंडळ कोलगाव, रात्री ८ वाजता कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ तळवडे, ९ वाजता श्री रायकर प्रासादिक भजन मंडळ चराठा-वझरवाडी, ​९.३० वाजता श्री हेळेकर प्रासादिक भजन मंडळ कारिवडे-पेडवेवाडी, १०.३० वाजता श्री घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ घोडेमुख यांची भजने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com