काजू बागायतदारांची व्यथा 
आगामी अधिवेशनात मांडू

काजू बागायतदारांची व्यथा आगामी अधिवेशनात मांडू

Published on

25449

काजू बागायतदारांची व्यथा
आगामी अधिवेशनात मांडू

नीलेश राणे : उत्पादकांना न्याय देऊ

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ : सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांच्या व्यथा अधिवेशनात मांडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार नीलेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांतर्फे कुडाळ विधानसभा मतदारसंघ आमदार नीलेश राणे यांची बागायतदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मालवण येथील ‘नीलरत्न’ या निवासस्थानी भेट घेतली.
यात काजू उत्पादन, विक्री दर, उत्पादन समस्या, वन्यप्राणी उपद्रव आणि संबंधित इतर प्रश्नांविषयी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, खजिनदार आकाश नरसुले यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राणे यांना लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी काजू उत्पादन, राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील काजू आवक, दर, स्थानिक आणि आयात काजूची प्रतवारी यांविषयी माहिती देण्यात आली. विशेषतः लगतच्या गोवा राज्यात काजूसाठी मिळणारा भाव यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. माहिती जाणून घेतल्यानंतर त्यावर सकारात्मक लक्षवेधी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com