ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मांदियाळी
- ratchl१८१.jpg ः
२६O२५४७४
चिपळूणः फिरत्या वस्तुसंग्रहालयास विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटी.
-----
ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी मांदियाळी
सिंधू-सरस्वती संस्कृती प्रदर्शन ; १५ हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मुंबई आणि इतिहास संकलन समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू-सरस्वती संस्कृती फिरते वस्तुसंग्रहालय प्रदर्शन जिल्ह्यात ठिकठिकाणी दाखवण्यात येत आहे. याचा चिपळूण, खेड, दापोली तालुक्यातील १५ हजार विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला.
चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, गद्रे इंग्लिश स्कूल, मोरवंडे व बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालय, सावर्डे वरिष्ठ महाविद्यालय, सावर्डे इंग्लिश मीडियम स्कूल, गोविंदराव निकम महाविद्यालय, मांडकी पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, चिपळूण आयोजित ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन २०२६, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय व वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू इंग्लिश मीडियम स्कूल, रामपूरमधील मिलिंद विद्यालय, दापोली अर्बन बँक विज्ञान महाविद्यालय, ए. जी. हायस्कूल, दापोली ज्ञानदीप महाविद्यालय, देवखेरकी ढेरे माध्यमिक विद्यालय, कौंढरताम्हणे जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणच्या सुमारे १५ हजार विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला. यासाठी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, महेश महाडिक यांनी पुढाकार घेतलेला होता. ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान याचे आयोजन केले होते. या कालावधीत प्रदर्शनाचे नियोजन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे अथर्व गायकवाड, ऋतुजा काळे, श्रुती येसावरे, प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी. प्रा विकास मेहेंदळे, इतिहास संकलन समिती रत्नागिरी यांनी नियोजन केले.
---
चौकट
ही आहेत प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
सिंधू व सरस्वती संस्कृती ही भारतातील प्राचीन संस्कृती आहे. ती अतिशय विकसित होती. वैशिष्ठ्यपूर्ण नगररचना, पाणीपुरवठा योजना, धातूशास्त्र, रसायन तंत्रज्ञान याची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती व्हावी, ग्रामीण भागातील मुलांना, समाजातील लोकांना उत्खननात सापडलेल्या वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा, यासाठी जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये हे प्रदर्शन घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

