मंडणगडला परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही मंडणगडला परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही

मंडणगडला परीक्षा केंद्रावर
प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही
मंडणगडला परीक्षा केंद्रावर
प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही
Published on

मंडणगडला परीक्षा केंद्रावर
प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही
मंडणगड ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या एसएससी बोर्ड परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. २० पासून सुरू होत असलेल्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती व तणाव कमी करण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक शांताराम बैकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या केंद्रावर २७६ विद्यार्थी बसणार आहेत. केंद्रावर भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नियुक्त घटकांची सभा घेऊन सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे केंद्र संचालक विजय खाडे यांनी सांगितले. उपकेंद्र संचालक शांताराम बैकर, स्टेशनरी प्रमुख चिंतामणी पिंगळा व लेखनिक बजरंग गावडे यांनीही नियोजनात सहभाग घेतला आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली असून, गैरप्रकार टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिराला
तुळसणीत प्रतिसाद
संगमेश्वर ः श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिक्षण मंडळ, तुळसणी संचलित लोकविद्यालय तुळसणी या माध्यमिक शाळेचा ''हीरक महोत्सव'' १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत मंगळवारी (ता. १७) आयोजित आरोग्य शिबिरात विद्यार्थी आणि ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात रत्नागिरी येथील ''जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क'' या सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या वेळी प्रत्येकाला ''ब्लड ग्रुप कार्ड''चे वाटप करण्यात आले. राजेश नेवरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच, संगमेश्वर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुलींना त्यांच्या समस्या आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चंडिका देवी मंदिरात
गोळवलीत मूर्तिप्रतिष्ठापना
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील ग्रामदेवता श्रीदेवी चंडिका पडळकरीन देवीच्या नूतन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. गोवा राज्यातून आणलेल्या नूतन मूर्तीचे मंगळवारी (ता. १७) दुपारी धामणी-गोळवली येथे आगमन झाले. या वेळी उपस्थित भक्तांनी देवीचे स्वागत केले आणि आनंदी जल्लोषात आगमन मिरवणूक काढण्यात आली. गोळवली ग्राममंदिरातील नूतन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा १८ ते २० फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत होत आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गोवा येथून मूर्ती दाखल होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि वारकरी दिंडीच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावप्रमुख दत्ताराम दुदम, शंकर दुदम, मानकरी विनोद पाध्ये, माजी पोलिसपाटील आप्पा पाध्ये, प्रसाद आमकर, अशोक चव्हाण, मनोहर किंजळकर, दीपक चव्हाण यांच्यासह सर्व वाडीकर आणि मुंबईकर मंडळींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांच्या मोठ्या उपस्थितीने संपूर्ण गोळवली परिसर भक्तिमय झाला असून, आता पुढील तीन दिवस विविध धार्मिक विधींनी हा सोहळा होणार आहे.

मंडणगड पंचायत समितीत
आज वार्षिक स्नेहसंमेलन
मंडणगड ः मंडणगड पंचायत समिती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मंडणगड पंचायत समितीचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या (ता. १९) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे. दिवसभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सन्मानपर कार्यक्रम होणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे. कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सदस्या प्रणाली चिले, दीप्ती घडशी, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीपक मालुसरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, उपअभियंता कविता जवादे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची सुरवात सकाळी १० वा. उद्‍घाटन सोहळ्याने होणार असून, ११ वा. व्याख्यान, दुपारी १२ वा. आदर्श कर्मचारी पुरस्कार व बक्षीस वितरण, २ वा. स्नेहभोजन आणि ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com