मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात
rat१८p२३.jpg-
P२६O२५४५७
रत्नागिरी : मिरजोळे येथील श्री कालिकादेवी मंदिरावर कलशारोहण करताना पाटील महाराज रामदासी पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात कलश मिरवणुकीत सहभागी महिला भाविक.
----
कालिकादेवीचा कलशारोहण सोहळा उत्साहात
मिरजोळेत जयघोषात धार्मिक विधी, भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा आज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात झाला. सज्जनगडचे पाटील महाराज रामदासी यांच्या हस्ते आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिराचा सुवर्णकलश प्रस्थापित करण्यात आला. शिखर प्रतिष्ठान आणि मुख्य कलशारोहण संपन्न होताच भाविकांनी देवीचा जयजयकार केला.
सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सोहळ्याची सुरुवात सकाळी मंगलाचरण, संकल्प आणि वास्तुशांती या विधींनी करण्यात आली. त्यानंतर अनंत वासुदेव गुरव यांच्या निवासस्थानापासून मुख्य कलशाची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘आई कालिकादेवीच्या’ जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने मिरजोळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर मंदिरात होमहवन आणि पूर्णाहुतीचा कार्यक्रम पार पडला.
कलशारोहणानंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना पाटील महाराजांनी धार्मिक परंपरेचे महत्त्व विशद केले. त्यानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे नेटके नियोजन मिरजोळे ग्रामस्थ, मानकरी आणि श्री कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

