११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
rat१८p११.jpg- ः
P२६O२५३७८
दापोली - चिखलगाव येथे आयोजित शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन करताना.
-----
चिखलगावात ११वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
दापोली, ता. १९ ः बदलत्या काळात शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड अधिक घट्ट होत असून, कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवे अध्याय लिहिले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या आधुनिक घडामोडींची माहिती घेत भविष्याची दिशा निश्चित करावी, या उद्देशाने लोकसाधना संचलित कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगाव येथे ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ व कृषी विभागाच्या विविध योजनांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागाच्या उपकृषी अधिकारी (उंबर्ले) वैदेही गुहागरकर यांनी पिकविमा, अनुदान योजना, तांत्रिक सहाय्य तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी ( देवके) दर्शना वरवडेकर यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲपचे महत्त्व विशद करत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पीक नियोजन, हवामान अंदाज आणि कीड नियंत्रण अधिक सुलभ कसे होऊ शकते याची माहिती दिली. शेतातील एका झाडाच्या सावलीत निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
फणसोप येथे शिष्यवृत्ती
परीक्षा मार्गदर्शन शिबिर
पावस, ता. १९ ः सन्मती फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर श्री लक्ष्मीकेशव माध्यामिक विद्यालय कसोप-फणसोप येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका राजेशिर्के यांनी वर्ग उपलब्ध करून दिले. शिबिराकरिता ग्रामीण भागातील आठ शाळांतील ६० विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते वह्या व पेन वाटप करण्यात आले. पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या शिक्षिका श्रद्धा बोडेकर व पूनम काटकर यांनी इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हे विषय विद्यार्थ्यांना समजतील अशा प्रकारे शिकवले. फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम वारिसे यांनी शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे स्पष्ट केले.
rat१८p२०.jpg-
२६O२५४२३
पावस - तालुक्यातील गणेशगुळे येथे वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानवंदना देताना राष्ट्रसेविका समितीचे पदाधिकारी.
----
वासुदेव बळवंत फडके यांना मानवंदना
पावस, ता. १९ ः आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसेविका समिती रत्नागिरीच्या सेविकांनी गणेशगुळे येथील त्यांच्या मूळस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला तेथील नागरिक उपस्थित होते. लेखिका रत्नकोंदण प्रमुख सुनेत्रा जोशी यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्यावर आधारित स्वरचित रचना सादर केली आणि नंतर कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. वासुदेव बळवंत फडके यांच्या महान कार्याची आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती नवीन पिढीला, समाजाला समजावी, हा यामागील उद्देश होता. ग्रामस्थ महिला आणि पोलिस पाटील संतोष लाड हे कार्यक्रमाला उपस्थित होते. वेदिका मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी रेणुका प्रतिष्ठान अध्यक्ष दीपा पाटकर तसेच उपाध्यक्ष मृणाल भावे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
----
महिला बचतगटासाठी मार्गदर्शक शिबिर
पावस, ता. १९ ः महिला बचतगटाच्या माध्यमातून विविध गावात जाऊन कृषी विभागाच्या योजना घरोघरी पोचवत आहे. या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा तरच बचतगट सक्षम होऊन महिला आत्मनिर्भर बनू शकतात, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी सागर मासाळ यांनी चांदोर येथील महिला बचतगटाच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना केले. त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, पीएम किसान योजना, महाविस्तार एआय अॅप इत्यादी योजनेची माहिती सांगितली. या वेळी कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर राऊत व बचतगटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

