सुगम संगीत परीक्षेत मानसी कांबळे यांचे यश

सुगम संगीत परीक्षेत मानसी कांबळे यांचे यश

Published on

swt198.jpg
25649
मानसी कांबळे

सुगम संगीत परीक्षेत
मानसी कांबळे यांचे यश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : भारतीय सुगम संगीत महाविद्यालयाच्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सुगम संगीत’ परीक्षेत मालवणच्या मानसी कांबळे (पूर्वाश्रमीच्या रेखा पवार) यांनी देदीप्यमान यश संपादन केले. त्यांनी ‘गीत अलंकार भाग १’ परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या कलागुणांचा ठसा उमटवला आहे. ही परीक्षा नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडली. यामध्ये मानसी कांबळे यांच्यासह विविध स्तरावरील अनेक परीक्षार्थींनी यश मिळविले.
यात गीत अलंकार (भाग १) - मानसी कांबळे, मानसी फडके, गीत विशारद - मनाली जोगळेकर, गीत उपांत्य - मेघा मोरे, प्राची ढवळीकर, डॉ. मुग्धा आपटे, स्वाती जोशी, गुरुदेव नांदगावकर, गीत मध्यमा - योगेश मुळ्ये, भारत सावंत, ज्योती सावंत - देसाई, त्रिशा पवार, अनुश्री रायकर, गीत तृतीया - अंजली लिमये, श्रेयसी गांगण, मनीषा सारंगधर, रश्मी ठाकूर, सुनेत्रा तांबे, मंजिरी गुणे, दीपिका आठल्ये, पूजा तांबे, गीत द्वितिया - श्रद्धा जोशी, कश्मिरा सावंत, भाग्यश्री पावसकर, स्नेहा जोशी, उज्ज्वला पवार, अलका भावे, गीत प्रथमा - अक्षता कदम, माधवी कुलकर्णी, नरेंद्र घाडीगावकर, स्वरुपी किल्लेकर, रेणुका साळवी, डॉ. शुभांगी लांजेकर, डॉ. नेहा पाटील, स्नेहल मयेकर. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने आणि मालवणकरांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com