कुडाळात २४ पासून वर्धापन दिन सोहळा

कुडाळात २४ पासून वर्धापन दिन सोहळा

Published on

swt1912.jpg
O2564
श्री मारुती मूर्ती

कुडाळात २४ पासून
वर्धापन दिन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः शहरातील श्री देव मारुतीनगर ब्राम्हण देवस्थानचा ४० वा वर्धापन दिन सोहळा २४ व २५ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांसह मारुती मंदिर येथे होणार आहे.
मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ७ वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ''एकपदा'' अर्थात ''पृथ्वी कंकण'', बुधवारी (ता. २५) सायंकाळी ७ वाजता संगीत तिरंगी भजन सामना बुवा वैभव सावंत (सद्गुरू संगीत भजन मंडळ पिंगुळी, पखवाज-निखिल पावस्कर, तबला-साई नाईक), बुवा अरुण घाडी (श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी, पखवाज-विनित धुरी, तबला-जितेश परब, निवेदक-स्वरूप सावंत) व बुवा सुजित परब (श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक, पखवाज-तुषार लोट, तबला-हर्षद राणे) यांच्यात होणार आहे. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून श्री सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मारुतीनगर ब्राम्हण देवस्थान कमिटीतर्फे अध्यक्ष यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com