छत्रपतींच्या जयघोषाने रत्नागिरी शिवमय
-rat१९p३.jpg-
२६O२५५९६
रत्नागिरी ः शिवजयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेली पदयात्रा.
-rat१९p७.jpg-
२६O२५६०८
शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर उपस्थित रत्नागिरीकर.
-rat१९p८.jpg-
P२६O२५६०९
रत्नागिरी ः छत्रपती शिवरायांची महती सादर करताना विद्यार्थिनी.
------
शिवरायांच्या जयघोषाने रत्नागिरी ‘शिवमय’
पदयात्रेत विद्यार्थ्यांसह शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग ; पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांच्या गजर मुख्य आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालात शिवजयंतीच्या अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने आणि पोलिस बँडने दिलेल्या विशेष सलामीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांच्या पदयात्रेने संपूर्ण शहर ‘शिवमय’ झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांची युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, स्काऊट गाईड एनसीसी, एनएसएस यांच्या माध्यमातून ही पदयात्रा काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे महाराजांच्या अर्धपुतळ्यास अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजित गाताडे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रीती सुर्वे, सायली पाटील, पूजा पवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी गलांडे म्हणाले, महाराजांची युद्धनीती, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आजच्या तरुणाईसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून आपण त्या विचारांवर चालले पाहिजे. ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर क्रीडांगणातून निघालेली पदयात्रा महाराजांचा जयघोष करत मारुती मंदिर चौकात पोहोचली. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालशिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे, कृष्ण, विठ्ठल रखुमाई, प्रभू श्रीरामचंद्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेतील सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या पदयात्रेची सांगता जयस्तंभ येथे झाली. सोहळ्यात ग्लोबल मराठा हायस्कूल, दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, एनसीसी, एनएसएस, स्काऊड गाईडचे विद्यार्थी आदींसह नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
---
चौकट...
पोलिस बँडची प्रथमच मानवंदना
मारुती मंदिर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अश्वारूढ पुतळ्यास पोलिस बँड पथकाकडून पहिल्यांदाच विशेष सलामी देण्यात आली. पथकाने वाजवलेल्या धून आणि दिलेल्या सलामीने वातावरण अधिकच मंगलमय झाले. या मानवंदनेने आजच्या सोहळ्यास एक वेगळी उंची मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

