-विषय समिती सभापती, सदस्य निवड बिनविरोध

-विषय समिती सभापती, सदस्य निवड बिनविरोध

Published on

-rat१९p२१.jpg-
२६O२५६८८
मंडणगड : मंडणगड नगरपंचायत विषय समिती निवड प्रक्रियेनंतर सभापती व सदस्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
----
विषय समिती सभापती, सदस्य निवड
मंडणगड नगरपंचायत; स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्षा बेर्डे
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ ः जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मंडणगड नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती आणि सदस्य निवड प्रक्रिया नगरपंचायत सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संजय जाधव यांनी काम पाहिले.
निवड प्रक्रियेला नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये स्थायी समितीच्या सभापतिपदी ॲड. सोनल बेर्डे यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी वैभव कोकाटे, राजेश्री सापटे, मनिषा हातमकर व समृद्धी शिगवण यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी राजेश्री सापटे यांची निवड झाली असून, सदस्यपदी मुकेश तलार, रेश्मा मर्चंडे, आदेश मर्चंडे व नीलेश सापटे यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समितीच्या सभापतिपदी मनिषा हातमकर यांची निवड झाली. सदस्य म्हणून सुभाष सापटे, प्रियंका लेंढे, योगेश जाधव व मुश्ताकर दाभिळकर यांची निवड करण्यात आली. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी वैभव कोकाटे यांची निवड झाली असून, सदस्यपदी मुकेश तलार, प्रियंका लेंढे, विनोद जाधव व प्रमिला किंजळे यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी समृद्धी शिगवण यांची निवड झाली असून, सदस्यपदी रेश्मा मर्चंडे, वैशाली रेगे व प्रमिला किंजळे यांची निवड करण्यात आली. या वेळी प्रशासकीय अधिकारी अमित जाधव, महेश दळवी, मनोज मर्चंडे, अभिषेक साळेकर तसेच नगरपंचायत कर्मचारी समीर साळवी व आरती गोरिवले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com