युनायटेडमध्ये पारितोषक वितरण
युनायटेड स्कूलचे
पारितोषिक वितरण
चिपळूण : येथील युनायटेड इंग्लिश स्कूल शाळेचे द्वितीय पारितोषिक वितरण संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात झाला. अभ्यासाशिवाय कलाक्षेत्रात्त, सांस्कृतिक क्षेत्रात, बागकाम, सदाचारी आचरण, वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन यांसारख्या विविध क्षेत्रांमधे उल्लेखनीय कार्य करून आपले कलाकौशल्य दाखवणाऱ्या सुमारे ८५ विद्यार्थ्यांना जोशी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक संजय बनसोडे, माजी विद्यार्थिनी डॉ. अनुपमा जोशी, पर्यवेक्षिका कारदगे, वैशाली चितळे, सोळुंके उपस्थित होते.
माळवाशीतील डाक
कर्मचाऱ्यांचा सत्कार
संगमेश्वर ः रत्नागिरी विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या माळवाशीतील पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डाक विभागाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोस्टमास्तर बाळकृष्ण करंडे व पोस्टमन रमेश जौरत यांना गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा सत्कार समारंभ झाला. भारतीय डाक विभागाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन चांगली कामगिरी करणाऱ्या ब्रँच ऑफिसमध्ये माळवाशी पोस्ट ऑफिस अनेकवेळा अग्रस्थानी असते. रत्नागिरी विभागात सर्वात जास्त खाती उघडून माळवाशीने पहिला क्रमांक पटकावला आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ १०० टक्के लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी-गोवा विभागाचे डायरेक्टर आर. पी. पाटील, जिल्हा डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी कडगावकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
त्यांचा काळ्या फिती
लावून निषेध
लांजा ः तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काळ्या फिती लावून काम करत निषेध आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर लांजा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध केला. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी मोजणीसाठी लागणारे साहित्य कार्यालयात जमा करून केवळ कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मोजणीची कामे सध्या ठप्प झाली आहेत. यामुळे नागरिकांच्या जमिनीच्या मोजणीसंदर्भातील कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात लांजा भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार देवाशीष सुवरे, भूकरमापक तुषार कदम, परिरक्षण भूमापक काशिनाथ कुमठेकर, भूकरमापक शुभम कुरळपकर, शीतल कांळे, भूकरमापक संकेत सणस, अभिलेखपाल कीर्ती नार्वेकर, परिरक्षण भूमापक सुशील तळेकर, कनिष्ठ लिपिक प्रतिभा कचरे आणि शिपाई संदीप पोमेंडकर आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

