हरवलेले पैशांचे पाकीट अनपेक्षितरित्या परत
हरवलेले पाकीट
दिले परत
तळेरे ः दारुम गावडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा नुकताच जीर्णोद्धार सोहळा झाला. उत्सवासाठी गेलेल्या उदय दुधवडकर यांचे पैशांचे गहाळ झालेले पाकीट दोन दुचाकीस्वारांनी घरी येऊन त्यांच्या स्वाधीन केले. बुरंबावडे येथील दुधवडकर हे मठात आपल्या मित्रमंडळीसह दर्शनाला गेले होते. यादरम्यान दर्शनासाठी रांगेत असताना त्यांना मागच्या खिशातून पैशाचे पाकीट पडल्याचे जाणवले. पाकिटात त्यांचे ओळखपत्र व रोख रक्कम होती. दुसऱ्या दिवशी दुधवडकर मंदिरात पूजेसाठी गेले होते. यादरम्यान दुचाकीने आलेल्या दोघांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडे पाकीट सुपूर्द केले. पाकिटातील तेराशे रुपयांची रक्कम व ओळखपत्रही होते. हा अनुभव म्हणजे परमेश्वरी कृपा असल्याचे दुधवडकर यांनी सागितले.
...................
पडवेतील शिबिरात
२५ जणांचे रक्तदान
कुडाळ ः (कै.) आशिष परब मित्रमंडळाच्या वतीने पडवे येथे आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमावेळी पडवे माजी सरपंच सुभाष दळवी, उद्योजक एस. पी. सामंत, आनंद परब, शिवराम सावंत, मंडळाचे अध्यक्ष संतोष परब, राधाकृष्ण सामंत, नीलेश परब यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या रक्तदान शिबिराला सामाजिक कार्यकर्ते बापू पाताडे (कसाल) यांचे सहकार्य लाभले.
.......................
विद्यामंदिर प्रशाळेत
दहावी बैठक व्यवस्था
कणकवली ः येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला या परीक्षा केंद्रावर दहावीच्या फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे-मराठी माध्यम बीओ २३३३२ ते बीओ २३५८८, इंग्रजी माध्यम - बीओ २३५०२ ते बीओ २३५८४. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्र संचालक पी. जे. कांबळे यांनी केले आहे.
......................
वेतोरे सातेरी हायस्कूल
केंद्रावर बैठक व्यवस्था
वेंगुर्ले ः माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ साठी परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे केंद्र क्रमांक ८३०३ या परीक्षा केंद्रावर बी-०१९६८२ ते बी-०१९८१८ पर्यंत करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे (ता. वेंगुर्ला), कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली (ता. वेंगुर्ला), रायसाहेब डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ (ता. वेंगुर्ले) व (कै.) प. ना. मा. हायस्कूल तेंडोली (ता. कुडाळ) या प्रशालेतील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याची संबधित शाळा, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे वेतोरे केंद्र संचालकांनी कळविले आहे.
...........................
ओरोस भवानी मंदिर
वर्धापन दिन आज
ओरोस ः येथील देवी भवानी मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. २०) होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री देवी भवानी मूर्ती अभिषेक, ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते २ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ८ वाजता स्थानिकांची सुस्वर भजने होतील. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी मित्रमंडळ सावंतवाडा रहिवाशी यांनी केले आहे.
........................
चेंदवण येथे २८ ला
आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः चेंदवण येथील श्री देवी माऊली मंदिर येथे आनंद सखाराम शृंगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंजनी आनंद शृंगारे यांच्यावतीने आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगाने २८ फेब्रुवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल (पडवे) यांचे सहकार्य लाभणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ईसीजी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग, युरोलॉजी, कर्करोग, नेत्र, अस्थिरोग, स्त्री प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग आदी तपासणी तसेच गरजेप्रमाणे मोफत जेनेरिक औषधे वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनीष यादव, विष्णू गोसावी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अंजनी शंगारे व अतुल शृंगारे यांनी केले आहे.
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

