श्रमदानातून फुलली शाळेची परसबाग

श्रमदानातून फुलली शाळेची परसबाग

Published on

rat१९p१९.jpg-
२६O२५६७०
राजापूर ः देवाचेगोठणे केरावळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलवलेली परसबाग.
-rat१९p२०.jpg-
२६O२५६७१
राजापूर ः ग्रामस्थांना भाजीविक्री करताना मुले.

काही सुखद---------लोगो
-----
विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून फुलली शाळेची परसबाग
केरावळे प्रशालेतील प्रयोग; भाजीपाला विक्रीतून व्यवहारज्ञानाचे धडे, पोषण आहारातही उपयोग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः तालुक्यातील देवाचेगोठणे केरावळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून परसबाग फुलली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या श्रमाला शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या योगदानाची साथ लाभली. परसबागेच्या निर्मितीद्वारे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात श्रमदानासोबत व्यवहारज्ञानाचे धडे देणारी ही परसबाग लक्षवेधी ठरली आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेत देवाचेगोठणे केरावळे प्रशालेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद साठे, उपक्रमशील शिक्षिका प्रांजली धामापूरकर, संजय पुराणे यांनी प्रशाळेमध्ये परसबाग फुलवण्याचा निर्णय घेतला. त्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश नवाळे, उपाध्यक्षा पूर्वा घाडी, समितीचे अन्य पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांची सकारात्मक साथ मिळाली. केंद्रप्रमुख लक्ष्मण फाटक यांचेही मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या परिसरातील मोठे दगड ब्रेकरच्या सहाय्याने फोडून सपाटीकरण करण्यात आले. तयार केलेल्या वाफ्यांमध्ये पालकांनी श्रमदानातून माती आणून टाकले. त्यातून तयार झालेल्या परसबागेमध्ये शालेय पोषण आहारासाठी उपयुक्त ठरेल, अशी भाजीपाला लागवड करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परसबागेमध्ये कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, वांगी, मुळा, काकडी, भोपळा आदी पिकांची लागवड करण्यात आली. राघववाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक विहिरीवरून उपलब्ध करून दिलेले पाणी, देवाचेगोठणे ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून उपलब्ध करून दिलेले पंप आणि पाईपलाईनच्या सहाय्याने परसबागेला मुबलक पाणीही उपलब्ध झाले. परसबाग निर्मितीसह परसबागेतील नियमित कामे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पालकांनी उपलब्ध करून दिलेले शेण, पालापाचोळा व गोमूत्र यांच्या सहाय्याने खतनिर्मिती प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खताची भाजीपाल्याला मात्रा देण्यात आली. जीवामृत तयार करून त्याचाही वापर करण्यात आला. त्याच्यातून, फुललेल्या भाजीपाल्याचा शाळेच्या पोषण आहारामध्ये नियमित उपयोग केला जात आहे. त्याचवेळी अतिरिक्त भाजीपाल्याची गावामध्ये विक्री केली जात आहे.
----------
चौकट १
अर्थार्जनासाठीही उपयोग
केरावळे येथील शाळेतील परसबागेमध्ये पिकलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याचा पोषण आहारामध्ये नियमित समावेश केला जात आहे. त्यातून, मिळणाऱ्या अधिक पोषणमुल्यांमुळे मुलांचे आरोग्य सदृढ होत आहे. परसबागेमध्ये अतिरिक्त पिकणाऱ्या भाजीपाल्याची ग्रामस्थांना विक्री करून त्या द्वारे अर्थार्जनही केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com