

kan194.jpg
25732
कणकवली : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना नगराध्यक्ष संदेश पारकर. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील आणि इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतमध्ये
शिवाजी महाराज जयंती साजरी
कणकवली, ता. १९ : कणकवली नगरपंचायतमधील नगराध्यक्ष दालनात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवरायांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांनीही शिवरायांना अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती नगराध्यक्ष पारकर यांनी दिली. तर महाराजांचे संघटन कौशल्य आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभार आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या.
याप्रसंगी नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर, प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, प्रशांत राणे, अमोल भोगले, संदीप मुसळे, रोहन डिचोलकर, प्रशांत पिळणकर, सदानंद ताम्हाणेकर, पूजा तांबे, शितल हिंदळेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.