कणकवली : घाडी सत्‍कार

कणकवली : घाडी सत्‍कार

Published on

kan195.jpg
25741
मुंबई : येथील उपमहापौर संजय घाडी यांचा सत्‍कार मुंबई आणि सिंधुदुर्गातील घाडीगावकर सेवा समाजातर्फे करण्यात आला.

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा
घाडीगांवकर सेवा समाजातर्फे सत्कार
कणकवली, ता. १९ : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई तसेच सिंधुदुर्ग आणि सर्व विभागांतील पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता.१८) मुंबईचे महापौर संजय शंकर घाडी यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका येथे त्यांच्या दालनात भेट घेऊन सत्कार केला.
उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गावंकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १९ नोव्हेंबर १९५६ रोजी घाडीगांवकर समाजातील हुतात्मा सिताराम दुलाजी घाडीगांवकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिले होते. त्यानंतर तब्बल ७० वर्षांनी त्याच मुंबई शहरात घाडीगांवकर समाजातील एक कर्तृत्ववान, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून संजय घाडी यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळवून उपमहापौर या मानाच्या व जबाबदारीच्या पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला असल्‍याचे घनश्‍याम घाडीगावकर यावेळी म्‍हणाले.
समाज संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, सचिव गजानन घाडीगांवकर, जयप्रकाश घाडीगांवकर, नारायण घाडीगांवकर, सुहास गावंकर, विनय घाडी, सुनिल घाडीगांवकर, रामचंद्र घाडी, सतीश घाडी, कृष्णा घाडी, नामदेव घाडी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com