- काजू बी दर किलोला दिडशे रुपये
-rat१९p२२.jpg-
OP२६O२५६८९
पावस ः विक्रीसाठी आलेली काजू बी.
---------
पावस परिसरात काजू हंगाम जोमात
किलोस दीडशे रुपये दर ; गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन मर्यादित
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ ः रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरुवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली असून, बाजारात काजू बी ची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन मर्यादित असले तरी, सुरुवातीलाच काजूला १५० ते १६० रुपये दर मिळत आहे. ओल्या काजूगराला किलोला १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत.
यावर्षी पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावली होती; मात्र पावसाने विश्रांती घेताच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली. थंडीतील सातत्यामुळे काजूपिकाला आवश्यक असलेले पोषक हवामान तयार झाले. यामुळे झाडांना मोहोर चांगला आला आणि फळधारणेची प्रक्रियाही वेगाने पार पडली. सध्या बागांमध्ये काजू तयार झाला असून, बागायतदारांनी पीक काढणीवर भर दिला आहे. काजूच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्या वर्षी काजूला चांगला बाजारभाव मिळाला होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच कच्च्या काजूला प्रतिकिलो १५० ते १६० रुपये असा दर मिळत आहे. हा दर पुढील काही काळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच ओले काजूगर १५०० ते २ हजार रु. किलोने विकले जात आहेत. काजूचा दर समाधानकारक असल्याने अनेक बागायतदारांनी आपला माल स्थानिक बाजारपेठेत आणि काजू फॅक्टरीमध्ये विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली आहे. उत्पादनाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडे कमी असले तरी, मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे उत्पादनातील घट भरून निघेल, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत.
--------
कोट १
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी काजूला चांगल्या प्रकारे दर मिळत आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ चांगल्या प्रकारे करण्याची शक्यता आहे.
--संकेत राडये, गोळप, काजू बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

