सावंतवाडीत ''शिवचेतना रॅली''
swt1920.jpg
O25751
सावंतवाडी : शिवचेतना रॅलीत सहभागी युवा नेते विशाल परब व युवराज लखमराजे भोसले आदी शिवप्रेमी.
सावंतवाडीत ‘शिवचेतना रॅली’
शिवप्रेमींचा जल्लोष ः अबालवृध्दांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात ''स्वराज्य संघटना'' आणि शहरातील शिवप्रेमींच्यावतीने भव्य ''शिवचेतना रॅली'' काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवे फेटे परिधान करत, भगवा ध्वज उंचावत अबालवृद्ध महिला या रॅलीत सहभागी झाल्या. ऐतिहासिक राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला. गेली १४ वर्षे या रॅलीचे आयोजन केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात सावंतवाडी राजवाडा येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवराज लखमराजे भोसले व भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅली पुढे मार्गस्थ झाली. या रॅलीचे मुख्य आकर्षण वेशभूषा स्पर्धा ठरली. चिमुकल्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वस्त्र परिधान करत या रॅलीत सहभाग घेतला. ऐतिहासिक देखावे देखील या निमित्ताने साकारण्यात आले होते. रॅलीतील घोडेस्वार खास आकर्षण ठरला. शहरातून निघालेल्या रॅलीची जिमखाना येथे सांगता करण्यात आली.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, श्रीपाद सावंत, सुशांत पाटणकर, ॲड. राजू कासकर, अजित सांगेलकर, संदीप धुरी, संजय पार्सेकर, प्रमोद तावडे, महेश पांचाळ, समीर सावंत, अमोल साटेलकर, साक्षी वंजारी, कृतिका कोरगावकर, अंकित तेंडुलकर, हर्षल सावंत, विजय कदम, सायली शिंदे, पल्लवी रेगे आदींसह शिवभक्त सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

