चिपळूण-८३ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
चिपळूणातील ८३ ग्रामपंचायतींचा
प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ८३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारी (ता. २०) पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, ३० मार्चला प्रारूप तर २८ एप्रिलला अंतिम रचना केली जाणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारपासून गावांचे नकाशे तयार करून तलाठी व ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून सीमा निश्चित करणे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवणे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती त्यावर सुनावणी होऊन ४ मे रोजी अंतिम रचना केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

