रत्नागिरी- परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करणे अनिवार्य
25990
सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करणे अनिवार्य
कोकण विभागीय मंडळ; क्षेत्रीय अधिकारी, परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य आणि विभागीय मंडळाने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, विभागीय मंडळाने सर्व परीक्षा केंद्रशाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्र संचालकांसाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत व रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दहावीची परीक्षा आजपासून (ता. २०) सुरू झाली आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राचा परिसर, परीक्षेशी संबंधित सर्व वर्गखोल्या, आयटी आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे अनिवार्य केले आहे. केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही (दिव्यांग विद्यार्थ्यांचा जादा वेळ विचारात घेऊन) रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रेकॉर्ड केलेले फूटेज पेनड्राईव्ह संगणकावर किंवा आवश्यकतेनुसार हार्डडिस्कमध्ये पुढील आदेशापर्यंत जतन करून ठेवावे. आवश्यकतेनुसार क्लाउड स्टोअरेज किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कवर त्याचा बॅकअप् घेणे बंधनकारक आहे.
कोट
राज्य मंडळाच्या निर्देशानुसार, सर्व क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना याबाबत अवगत केले आहे. मंडळाच्या पुढील आदेशापर्यंत परीक्षा कालावधीतील रेकॉर्डिंग परीक्षा केंद्रांनी जतन करणे अनिवार्य आहे.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर मंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

