घारपी शाळेत रंगांची मुक्त उधळण

घारपी शाळेत रंगांची मुक्त उधळण
Published on

swt1921.jpg
25777
घारपी ः येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक विद्यार्थी व सोबत शिक्षक.

घारपी शाळेत रंगांची मुक्त उधळण
रंगभरण स्पर्धेस प्रतिसाद ः शिवजयंती निमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे शिवजयंतीनिमित्त भव्य चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसर शिवभक्तीच्या उत्साहाने आणि रंगांच्या उधळणीने भारावून गेला होता.
(कै.) शांताराम गजानन काणेकर (माजी ग्रामसेवक) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच सनी काणेकर (रा. बांदा) यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देखणे चित्र रंगांच्या माध्यमातून साकारले. प्रत्येक चित्रातून शिवप्रेम, धैर्य आणि स्वाभिमानाची झलक पाहायला मिळाली.
शिक्षकांनी शिवचरित्राची प्रेरणादायी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेचा निकाल असा ः पहिली ते दुसरी गट-कीर्ती गावकर, मानस नाईक, यज्ञा कविटकर, श्रेया असनोडकर. तिसरी ते चौथी गट-स्वप्नील गावडे, गार्गी गावडे, रुची नाईक, रुद्र सावंत, समर्थ कविटकर, पाचवी ते सातवी-स्वप्नाली गावडे, बळीराम गावडे, वैष्णवी गावडे, राज गावडे, भिकाजी नाईक, बाबाजी कविटकर, यशस्वी सावंत, इशिका असनोडकर, सिद्धी कविटकर.
या उपक्रमासाठी सनी काणेकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी कृतज्ञता व्यक्त केली. यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील व सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे धर्मराज खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com