कुंभार्ली घाटात दोन तास वाहतूक कोंडी

कुंभार्ली घाटात दोन तास वाहतूक कोंडी
Published on

-rat१९p२७.jpg-
२६O२५७७१
चिपळूण ः कुंभार्ली घाटात ट्रक बंद पडल्यानंतर निर्माण झालेली वाहतूक कोंडी.
-------
‘कुंभार्ली’त दोन तास वाहतूक कोंडी
ट्रक पडला बंद; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः कुंभार्ली घाटात आज सकाळी ट्रक बंद पडल्याने चिपळूण-कऱ्हाड मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी फुटली नव्हती. घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे सतत वाहने बंद पडत आहेत. त्यामुळे कुंभार्ली घाट हा वाहतुकीच्यादृष्टीने वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या घाटरस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत. आज सकाळी ७.४५च्या दरम्यान ट्रक बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबली. आज शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे अनेक पर्यटक बाहेर पडले होते. कुंभार्ली घाटमार्गे प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. चिपळूण आगारातून सुटलेल्या एसटी बसेस तसेच पश्चिम महाराष्ट्रातून चिपळूण, खेड, दापोली, गुहागरच्या दिशेने येणाऱ्या बससुद्धा घाटात अडकल्या होत्या. कुंभार्ली घाटातून होणारी मालवाहतूकही सकाळी दोन तास थांबली होती. कुंभार्ली घाटातील चेकपोस्टवर काम करणारे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंद पडलेला ट्रक बाजूला करण्यासाठी हायड्रा मशिन बोलवण्यात आली. सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
------------
कोट
खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाटरस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्याला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अशी बिकट अवस्था व्हायला नको. येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
--पराग वडके, प्रवासी, चिपळूण
------------
कोट
कुंभार्ली घाटरस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे संपूर्ण घाटरस्ता धोकादायक झाला आहे. येथे सतत वाहने बंद पडण्याचे तसेच वाहने कलंडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी, अशी मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचा वाहनचालकांना जितका त्रास होतोय तितकाच त्रास पोलिसांनाही होत आहे.
--भरत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अलोरे-शिरगाव पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com