

तरुणीची गळफास
घेऊन आत्महत्या
मंडणगड ः शहरातील पालवणी चेकपोस्ट परिसरात तरुणीने या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या किसन पवार (वय १८, मूळ रा. यड्रामी, जि. कलबुर्गी, कर्नाटक, सध्या रा. पालवणी फाटा, मंडणगड) ही तरुणी १८ फेब्रुवारीला सायंकाळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर संध्याकाळी पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलजवळील काजूच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भैरीदेवी मंदिरात
चोरीचा प्रकार
मंडणगड ः तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत भैरीदेवी मंदिरात चोरट्याने प्रवेश करून पितळी वस्तूंची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत १८ फेब्रुवारीला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मधुकर पाटील (वय ७१, रा. शिरगाव पाटीलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. यामध्ये सुमारे १५ किलो वजनाची मोठी पितळी घंटा (किंमत ९ हजार रु.), ५ किलो वजनाची दुसरी घंटा (किंमत ३ हजार रु.) तसेच सुमारे ८० वर्षे जुनी ५ किलो वजनाची पितळी समई (किंमत ३ हजार रु.) असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.