मालवणमध्ये शिवजयंतीदिनी शिवसेनेचा जनसेवेचा संकल्प

मालवणमध्ये शिवजयंतीदिनी शिवसेनेचा जनसेवेचा संकल्प

Published on

swt1927.jpg
25804
मालवण ः येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत.

मालवणमध्ये शिवजयंतीदिनी
शिवसेनेचा जनसेवेचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : शिवजयंतीच्या औचित्याने आज येथे शिंदे शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचा संकल्प सोडला.
सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. सामंत यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे संस्कार हेच आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेची प्रामाणिक सेवा करावी, अशी प्रार्थना आम्ही महाराजांच्या चरणी केली आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून आमदार नीलेश राणे या मतदारसंघात सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे, असे सांगितले. यावेळी संजय पडते, काका कुडाळकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, दीपक पाटकर, दादा साईल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com