-काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देणार ताकद

-काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देणार ताकद
Published on

‘त्या’ पदाधिकाऱ्यांना करणार बाजूला
उदय सामंत ः सामान्य कार्यकर्त्यालाच देणार ताकद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : विधानसभा आणि त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधींचा विकासनिधी आणला, नेते-पदाधिकाऱ्यांना मोठी काम देऊनही निवडणुकीत मताधिक्य घटल्याचे सामंतांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे ‘गब्बर’ झालेल्या पदाधिकाऱ्यांऐवजी जनमानसात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली असल्याचे रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांना ६० ते ७० हजारांच्या मताधिक्याची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात हे मताधिक्य ४० ते ४२ हजारांवर स्थिरावले. विकासकामे करूनही त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यांच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोट्यवधीची कामे मिळवली; परंतु जनमानसात हे पदाधिकारी आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ग्रामीण भागात ‘ठाकरे गटाचा’ कोणताही मोठा नेता प्रचाराला उतरला नाही. उमेदवारांना पक्षाने कोणतीही मोठी ताकद दिली नाही. त्यांना ५५ हजारांच्या आसपास मते मिळाली. ग्रामीण भागातील ‘ठाकरेसेने’चे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या पदाधिकाऱ्याच्या भागात पक्षाला कमी मते मिळाली, त्यांची ‘पत’ तपासूनच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. केवळ पदे भोगणाऱ्या नेत्यांपेक्षा जमिनीवर राहून प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्याला आता सत्तेत स्थान मिळणार असल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सर
---
सर्व सभापतिपदे शिवसेनेकडेच
जिल्हा परिषद निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने ५६ पैकी ४१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे; मात्र, सत्ता स्थापनेच्या हालचालीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, सर्व महत्त्वाची सभापती पदे शिवसेना आपल्याकडेच ठेवणार आहे. जलसंधारण आणि स्थायी समितीमध्ये मित्रपक्षांना स्थान दिले जाईल; मात्र मुख्य पदे शिवसेनेकडेच राहतील. विशेष म्हणजे, पदासाठी फोल्डिंग लावणाऱ्यांना किंवा मागायला येणाऱ्यांना पदे मिळणार नाहीत तर जे कार्यकर्ते निष्ठेने पक्षासोबत राहिले त्यांनाच संधी दिली जाणार आहे. २३ तारखेला गटनेत्यांची निवड होणार असून, यात राष्ट्रवादीचा गटही सोबत असण्याची चर्चा आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com