लांजा - साटवलीत रक्तदान शिबिरात ३९ दात्यांचा सहभाग
साटवलीत रक्तदान शिबिरात
३९ दात्यांचा सहभाग
लांजा, ता. २० ः शिवप्रतिष्ठान साटवलीतर्फे गुरूवारी (ता. १९) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवजयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्यकेंद्र साटवली या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदेश आंबोळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी साटवली सरपंच दत्ताराम सावंत हे उपस्थित होते. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे डॉ. जयश्री राठोड, डॉ. सबा शेख, प्रभाकर मुळेकर, प्रणाली आयरे, धनश्री पानवलकर, निनाद आडविरकर, नीलेश तेरवणकर तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्र साटवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोटमपाड, आरोग्य सहाय्यक कारेकर, आरोग्य सहाय्यक सावरटकर, आरोग्य सहाय्यिका म्हेत्रे, कनिष्ठ सहाय्यक जांगळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी माजी सरपंच महेश नारकर, ग्रामस्थ सादिक कोंडकरी, युसुफ काझी, ओमकार गांगण, सुनील शेलार, आमीर आंबोळकर, योगेश चाळके, प्रशांत भालेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

