फेट्यांसह ऐतिहासिक वेशभूषा अन् ‘जय शिवाजी’चा निनाद
25911
फेट्यांसह ऐतिहासिक वेशभूषा
अन् ‘जय शिवाजी’चा निनाद
देवगडमध्ये शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेली तसेच फेटे बांधून मंडळी सहभागी झाली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहरातून देवगड किल्ल्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यामध्ये फेटे बांधून अनेकजण सहभागी झाले होते. तसेच महिलांचाही सहभाग होता. ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेली मुलेही होती. किल्ल्यावर ऐतिहासिक वेशभूषेतील मुलांची उपस्थिती होती. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. येथील शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्ताने वातावरण शिवमय झाले होते. शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. येथील किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम झाले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत शिवजयंती उत्सवाचे कार्यक्रम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

