पाटकर वर्दे महाविद्यालयाचे पाककला स्पर्धेमध्ये यश
25919
पाटकर वर्दे महाविद्यालयाचे
पाककला स्पर्धेमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : मुंबई येथे बेटर किचन एव्हरेस्ट कल्नरी चॅलेंज आयोजित राष्ट्रीय पाककला स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील चिकित्सक समुहाच्या पाटकर वर्दे महाविद्यालयातील दामिनी पालव हिने रौप्य, हर्षदा दीपनाईक हिने कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत भारतातील नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा जिंकून पाटकर वर्दे महाविद्यालयाने मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई गोरेगाव येथील चिकित्सक समुहाच्या पाटकर वर्दे कॉलेजच्या इसा पटेल, कृष्णा राणे, श्रावणी सकपाळ, मिनती वैद्य यांनी देखील रौप्य पदक प्राप्त करत या अंतिम फेरीत यश प्राप्त केले. ‘पाटकर वर्दे’च्या दोन्ही महाविद्यालयांनी या स्पर्धेत यश मिळवल्यामुळे महाविद्यालयासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, हेड शेफ डॉ. अमोल राऊळ, शेफ क्युरी फर्नांडिस, भावेश म्हापणकर, कौस्तुभ नाईक, अमित गावडे, संजय कोकरे आणि प्रसन्न लाड यांचे मार्गदर्शन लाभले. एकता भार्गव यांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

