वेंगुर्लेकर महाविद्यालयात 
छत्रपती शिवरायांना वंदन

वेंगुर्लेकर महाविद्यालयात छत्रपती शिवरायांना वंदन

Published on

25920
पणदूर : पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयातर्फे शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले.

वेंगुर्लेकर महाविद्यालयात
छत्रपती शिवरायांना वंदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : पणदूर तिठा येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. ''महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून जीवनात ध्येय, शौर्य, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान जोपासावे, असे विचार प्राचार्य पवार यांनी मनोगतातून व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रथमेश गोसावी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रांजना पारकर, तसेच इतर प्राध्यापकवर्ग, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. व्ही. गावडे यांनी केले. प्रा. स्मिता परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com