शिवरायांचा इतिहास जपणाऱ्या मावळ्यांचे कौतुक
25915
शिवरायांचा इतिहास जपणाऱ्या मावळ्यांचे कौतुक
आमदार नीलेश राणे ः कुडाळात शिवजयंती सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारखे मावळे सातत्याने विविध उपक्रमांतून प्रयत्न करत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील भारतीय मराठा समाज महासंघ, माठेवाडा येथील स्वराज्य मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील दत्तराज मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार राणे बोलत होते.
आमदार राणे यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, दीपक नारकर, माजी नगरसेवक सचिन काळप, पंचायत समिती सदस्य करुणा पावसकर, शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, अखिल मराठा महासंघाचे धीरज परब, शैलेश घोगळे, स्वराज मित्रमंडळाचे शिवम म्हाडेश्वर, दत्तराज मित्रमंडळाचे बल्लाळ, रेवती राणे, आबा धडाम, राकेश कांदे, चेतन पडते, साक्षी सावंत, रेखा काणेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

