चौके मांडखोल शाळेत शिवजयंती उत्साहात

चौके मांडखोल शाळेत शिवजयंती उत्साहात

Published on

(फोटो तीन कॉलम करा)
25912

चौके मांडखोल शाळेत शिवजयंती उत्साहात
ओरोस, ता. २० : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल शाळेत (ता. मालवण) शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मुलांनी शाळेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शालेय परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
या ठिकाणी शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात सहभाग दर्शवला. यावेळी मुलांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. शिवाजी महाराज यांच्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. त्यानंतर गीतगायन स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान भेट व वध सर्वांना खूपच भावला. या सर्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक नंबर मिळवले. सायंकाळी या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या उत्तम सहकार्यामुळे पार पडला. या मुलांना शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण व मुख्याध्यापक दीपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com