चिपळूण ः रस्त्यावरील तडे लपविण्यासाठी डांबराचे ‘पॅचवर्क’
rat20p11.jpg-
25908
चिपळूण ः चिपळूण-गुहागर मार्गावर करण्यात आलेले डांबरीकरण.
---------
रस्त्यावरील तडे लपवण्यासाठी
सिमेंटवर डांबराचे ‘पॅचवर्क’
गुहागर–विजापूर महामार्ग; काँक्रिटीकरणाचा दर्जा उघड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मार्गताम्हाणे ते रामपूरदरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा अवघ्या काही महिन्यांतच उघड झाला आहे. नवीन रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून, ही दुरवस्था लपवण्यासाठी संबंधित विभागाने सिमेंटवर डांबराचे ‘पॅचवर्क’ करण्यास सुरवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच मार्गताम्हाणे ते रामपूर या पट्ट्यात कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता दीर्घकाळ टिकेल, अशी अपेक्षा होती; मात्र अल्पावधीतच रस्त्याचा पृष्ठभाग उखडण्यास सुरवात झाली असून, अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील हे तडे तांत्रिकदृष्ट्या दुरूस्त करण्याऐवजी त्यावर डांबराचा थर देऊन खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

