राजापूर-राजापुरात डाक विभागाच्या फ्रेंचायसीचे उदघाटन
rat20p9.jpg-
25906
राजापूर ः भारतीय डाक विभागाच्या राजापूर शहरातील बाजारपेठेत आऊटलेट सुरू करण्यात आले असून, याचा शुभारंभ गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे डाक निदेशक आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
--------------
राजापुरात डाक विभागाच्या फ्रेंचायसीचे उद्घाटन
राजापूर, ता. २० ः भारतीय डाक विभागाच्या सुधारित फ्रेंचायसी याजनेंतर्गत शहरातील बाजारपेठेत आऊटलेट सुरू करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे डाक निर्देशक आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय डाक विभागाने अधिकृतरित्या आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी एका सुधारित फ्रेंचायसी योजनेची सुरवात केली आहे ज्यामध्ये देशभरात भारतीय डाक फ्रेंचायसी आउटलेट उघडण्यासाठी व्यक्ती, उद्योजक किंवा संस्थांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्राहकांना डाक विभागाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय टपाल विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर शहरात कौस्तुभ ठाकूरदेसाई यांनी घेतलेल्या डाक विभागाच्या फ्रेंचायसीचे उद्घाटन डाक निर्देशक आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्ञानेश्वर कुलकर्णी, संजय मठकर उपस्थित होते.
चौकट
स्पीडपोस्ट सुरू, अन्य सेवा टप्प्याटप्प्याने
भारतीय डाक विभागाच्या सुधारित फ्रेंचायसी याजनेंतर्गत राजापूर शहरातील बाजारपेठेमध्ये आऊटलेट सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये स्पीडपोस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती कौस्तुभ ठाकूरदेसाई यांनी दिली. भविष्यामध्ये या ठिकाणी पोस्टाच्या अन्य सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

