डिगसमध्ये गव्यांचा कळप थेट लोकवस्तीच्याजवळ
26004
डिगसमध्ये गव्यांचा कळप
थेट लोकवस्तीच्या जवळ
स्थानिकांत घबराट; शेतीचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : तालुक्यातील डिगस, सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गव्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळी पिके गवे पायदळी तुडवत असून नाचणी, मका, वाल, कुळीथ आदी पिके फस्त केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सायंकाळी सातपासून रात्रभर लोकवस्तीजवळ गव्यांचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही अनेकदा चोरगेवाडी फाटा, खांदीचे गाळू भागात भर रस्त्यावर गव्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे. गेल्या काही दिवसांत तर त्यांच्या उपद्रवात मोठी वाढ झाली आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. वनविभागाने या भागात गस्त वाढवून, गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

