कासार्डेत ‘मित्रप्रेम’ कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
26005
कासार्डेत ‘मित्रप्रेम’ कार्यालयाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २० : कासार्डे येथे स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा व संजय नकाशे यांचे मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, महेश नारकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय नकाशे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सहदेव खाडये, हर्षदा वाळके, राजेश जाधव, बंटी रावराणे, सरपंच निशा नकाशे, श्रीरंग पाताडे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. तत्पूर्वी स्वीटलँड इंग्लिश मीडियम स्कूल, तळेरे यांचे मर्दानी खेळ, महिलांसाठी हळदीकुंकू व डबलबारी भजनांचा जंगी सामना आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमासाठी संजय नकाशे मित्रपरिवार व स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

