समाजप्रबोधनासाठी लेखणी 
धारदार ठेवा ः देशपांडे

समाजप्रबोधनासाठी लेखणी धारदार ठेवा ः देशपांडे

Published on

26047

समाजप्रबोधनासाठी लेखणी
धारदार ठेवा ः देशपांडे

कणकवलीत जांभेकर यांना वंदन

कणकवली, ता. २० : ‘सिंधुदुर्गातील पत्रकारिता दर्जेदार आहे. जिल्ह्यातील पत्रकार समाजप्रबोधनासाठी नीतीमूल्यांवर आधारित काम करत आहेत. बाळशास्त्रींचा हा आदर्श पुढे सुरू ठेवताना पत्रकारांनी आपली लेखणी धारदार ठेवावी,’ असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आज केले.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्‍यांना कणकवली तालुका पत्रकार संघ आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज अभिवादन करण्यात आले. येथील तहसीलदार दालनात हा कार्यक्रम झाला. तहसीलदार म्हणाले, ‘केवळ ३२ वर्षांचे अल्प आयुष्य लाभूनही जांभेकरांनी शून्यातून विश्व निर्माण केले. कोणतीही परंपरा नसताना त्यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. आजच्या काळात समाजप्रबोधनासाठी पत्रकारांनी आपली लेखणी अधिक धारदार ठेवावी. प्रशासन कायम तुमच्या पाठीशी उभे राहील. समाजाचा आरसा म्हणून पत्रकार जसे वागतात, तसाच समाज घडत जातो.’ यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त करताना जांभेकरांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी भगवान लोके, संजय सावंत आदींसह नायब तहसीलदार मुकुंद मंडले, मंडल अधिकारी मनीषा बोडके, सहायक महसूल अधिकारी संभाजी खाडे, महसूल सहायक हेमलता तोरसकर, रणजीत चौगुले, मंगल गायकवाड, क्रांती सावंत, धनश्री आरोलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com