राजापूर-वखारीच्या सुशोभीकरणाची जठारांकडून पाहणी
rat20p10.jpg-
25905
राजापूर ः ब्रिटिशकालीन इंग्रज वखारीच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करताना माजी आमदार प्रमोद जठार. या वेळी उपस्थित मोहन घुमे, रवींद्र नागरेकर, स्वप्नील गोठणकर, नागेश शेटये.
--------
वखारीच्या सुशोभीकरणाची जठारांकडून पाहणी
वाढीव निधीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही; कामाबाबत सूचनाही
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः शहरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या ब्रिटिशकालीन इंग्रज वखारीच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुशोभीरणामुळे इंग्रज वखारीचे रूपडे पालटणार आहे. सुशोभीकरणाच्या कामाची माजी आमदार प्रमोद जठार यांनी पाहणी केली. सुशोभीकरणाच्या कामाबाबत केलेल्या सूचना व बदलांप्रमाणे काम करण्याचे आश्वासित करताना वाढीव निधीही शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जठार यांनी दिली.
इंग्रज वखारीची दूरवस्था झाली होती. शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत जठार यांनी वखारीच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून वखारीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. इमारतींची डागडुजी, परिसराचे सुशोभीकरण आणि या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंगांचे भित्तीचित्र उभारले जाणार आहेत.
या कामाची माजी आमदार जठार यांनी पाहणी केली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, भाजप प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, प्रसाद पाटोळे, स्वप्नील गोठणकर, माजी नगरसेवक नागेश शेट्ये आदी उपस्थित होते. या प्रसंगी सुरू असलेल्या कामात काही बदल सुचवण्यात आले. यामध्ये पायर्यांना रेलिंग बसवणे, बैठक व्यवस्था, लाईट व्यवस्था अशी कामे सुचवण्यात आली. जुन्या वखारीचे जनत करताना त्यासाठी तशा प्रकारे बांधणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

