साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती

साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती

Published on

rat20p12.jpg-
26027
देवरूख ः शिवजयंतीनिमित्त माने अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पालखी मिरवणुकीत सहभागी विद्यार्थी.
-------

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती
साडवली, ता. २० ः छत्रपती शिवाजी महाराज यांची रयतेचा राजा म्हणून ओळख असून, आज तब्बल चारशे वर्षानंतरही त्यांचे विचार आदर्शवत आहेत; परंतु महाराजांचे विचार हे शिवजयंतीपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी किमान एखादा तरी गुण कृतीत आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सीईओ प्रद्युम्न माने केले.
आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पहाटे पहाटे महाविद्यालयातील शिवप्रतिष्ठान विद्यार्थी सदस्य शिवज्योत आणण्यासाठी कसबा (ता. संगमेश्वर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी रवाना झाले. तेथील कर्णेश्वर मंदिरात पूजा करून मशाल प्रज्वलित करून शिवज्योत महाविद्यालयाकडे मिरवणुकीने आणण्यात आली. देवरूख येथे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी निवासस्थानी शिवज्योतीची पूजा केली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी व शिवज्योत लेझिम आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने महाविद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला संस्थेचे सीईओ प्रद्युम्न माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com