रत्नागिरी-रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मच्छीमारांना ३ दिवसाचे प्रशिक्षण
rat20p25.jpg
26044
रत्नागिरी ः मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात मच्छीमारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
------------
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मच्छीमारांना तीन दिवसाचे प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. २० : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छीमारांना रत्नागिरीतील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या सिंधुदुर्गातील ५ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. या प्रमाणपत्राआधारे त्यांना मत्स्योद्योग आणि पूरक उद्योगांसाठी बँकांकडून अर्थपुरवठा होऊ शकणार आहे. प्रशिक्षणामुळे मासेमारी उद्योगातील सुरक्षितताही वाढणार आहे.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत, सिंधुदुर्गचे रवींद्र मालवणकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, लतिका गावडे, उत्कर्षा कीर यांनी हा प्रशिक्षण उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले. सीआयएफएनईटी या संस्थेकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मच्छीमार नौका इंजिनच्या देखभाल दुरूस्तीचे मार्गदर्शन करण्यात आल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाणारी नौका मध्येच बिघडली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करून बंदर गाठता येऊ शकणार आहे. यामुळे मच्छीमारांची सुरक्षितता निश्चित झाली आहे. या प्रशिक्षणात मासेमारीची पद्धत शिकवण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

