चिपळूण -राजीनामा देऊनही भाजपतर्फे सूडबुद्धीने कारवाई
राजीनामा देऊनही भाजपतर्फे
सूडबुद्धीने कारवाई
चिपळूण, ता. २० : आपण काही महिन्यापूर्वीच भाजपचा राजीनामा दिला असून, त्यानंतर आपला पक्षाशी काडीमात्र संबंध नाही. असे असताना केवळ सूडबुद्धीने जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या निलंबनाच्या कारवाईचा बाऊ केला आहे. त्यामुळे यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्ह्यातील अनेकांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्या आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. उत्तर रत्नागिरी सरचिटणीस मंदार कदम याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, तो जेलमध्ये आहे . त्याच्यावर कारवाई न करता उलट त्याला सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यात कोण गेले होते? कोणत्या वरिष्ठाचा फोन आला होता? तेही जिल्हाध्यक्ष मोरे यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हानही भोसले यांनी दिले. येथे पक्षाचे काम केवळ कागदावर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे येथे खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

