रत्नागिरीःक्राईम

रत्नागिरीःक्राईम

Published on

झाडावरून पडून नेपाळी कामगार जखमी
रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे येथे हापूस आंब्याची मोहोर आलेल्‍या कलमांची फांदी हलविताना अचानक फांदी तुटल्याने नेपाळी कामगार झाडावरून पडला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्रबहाद्दूर लक्ष्मण गिरी (वय ५०, रा. चिंचखरी, रत्नागिरी, मूळ रा. नेपाळ) असे जखमी कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास मावळंगे येथील मनिंदर विकास पाटील यांच्या कराराने घेतलेल्या आंबा कलमांच्या बागेत घडली. त्याच्या कमरेला मुका मार लागला, तर डाव्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचा मृत्यू
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात येथील प्रवासी संगमेश्वर प्लॅटफार्मजवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मनदोरा रमेश देवजी (वय ४८, रा. जामनगर, गुजरात) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी पावणेनऊच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवजी हा संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे रेल्वेतून पडला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. २०) सकाळी पावणेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
------------

मोटार-दुचाकी अपघातात दोघे जखमी
रत्नागिरी : हातखंबा तिठा येथील रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण जखमी झाले. शुभम संतोष घवाळी (वय ३०) व राहुल सुनील पालेकर (वय २६, दोघेही रा. खेडशी नाका, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास हातखंबा तिठा येथील वळणावर घडली. शुभम घवाळी व राहुल पालेकर हे दोघे दुचाकीने (एमएच ०८ एएच ८८७७) रत्नागिरी ते निवळी जात होते. मोटार (एमएच ०३ बीडब्ल्यू ७३३१) रत्नागिरीहून पालीकडे जात असताना हातखंबा तिठा येथील वळणावर दुचाकी व मोटार यांच्यात धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील घवाळी व पालेकर हे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-----------
चांदोर फाटा येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पावस : तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मृत स्वाराविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीमंत आप्पासाहेब बडची (वय ३६, रा. सध्या रा. निरूळ चिरेखाण, मूळ रा. अथणी, बेळगाव) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी साडेबाराच्या सुमारास चांदोरफाटा येथील कोकरे यांच्या घरासमोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बडची हा दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम किलारी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पूर्णगड पोलिस अंमलदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com