अवैध धर्मांतराविरोधात कायदा करा

अवैध धर्मांतराविरोधात कायदा करा

Published on

26067

अवैध धर्मांतराविरोधात कायदा करा

हिंदू संघटना ः तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तत्काळ संमत करावा, अशी मागणी सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि विविध महिला संघटनांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१९ ते २०२१ या काळात महाराष्ट्रातून सुमारे १,७८,४०० महिला बेपत्ता झाल्या आहेत. सरासरी रोज १०३ महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर, नंदुरबार आणि रायगड यांसारख्या आदिवासी जिल्ह्यांत जमिनी हडपण्यासाठी आदिवासी मुलींशी विवाह करून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. ‘ड्रग जिहाद’ आणि सोशल मीडियावरील बनावट नावांद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण १० पटीने वाढले आहे. याविरोधात कठोर कायदा तत्काळ संमत करावा.’’
दरम्यान, निवेदन देताना रत्नाकर कोळंबकर, दीनानाथ गावडे, कीर्ती नाचणोलकर, शिल्पा खोत, रिमा कामत, साक्षी मयेकर, शांती तोंडवळकर, गौरी गवाणकर, अमृता फाटक, जान्हवी चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमदार यांनाही पाठविण्यात आले आहे. जर नारी सुरक्षित राहिली, तरच राष्ट्र सुरक्षित राहील, त्यामुळे सरकारने या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्र लव्ह जिहाद मुक्त करावा, अशी भावना उपस्थित महिला प्रतिनिधींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com