चिपळूण ः प्रवेशाची चर्चा पुरणपोळी, मोदक खाताना होत नाही
-rat20p21.jpg
26027
चिपळूण ः खरवते येथे पालकमंत्री उदय सामंत आणि ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक एकत्र चर्चा करताना.
प्रवेशाची चर्चा पुरणपोळी,
मोदक खाताना होत नाही
मंत्री उदय सामंत; वैभव नाईकांसमवेत राजकीय चर्चा नाही
चिपळूण, ता. २० ः उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक हे खरवते येथे एकत्र स्नेहभोजन करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले; मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे सांगत उदय सामंत यांनी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूण तालुक्यातील खरवते येथे शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नसमारंभानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. ‘आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत त्यामुळे मित्र म्हणून भेटलो आणि एकत्र जेवलो’, असे सांगून उदय सामंत म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी एकत्र आलो. हा राजकारणविरहित कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईदेखील येथे उपस्थित आहेत. पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे. वैभव नाईक हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे. आम्ही मैत्री राजकारणात आणली नाही.
आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो, हाच आदर्श अनेकांनी घेणे गरजेचे आहे. आम्ही एकत्र जेवायला बसलो याचा अर्थ ते आमच्या शिवसेनेत आले असा होत नाही. ते शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही. त्याला वेगळी बैठक करावी लागते, वेळ आली तर ती बैठक करू, असे त्यांनी म्हटले आहे.
---------------------------
चौकट
पुरावे असतील तर द्यावेत
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते तपास यंत्रणेला, सरकारला देतील. जय पवार आणि रोहित पवार यांच्या केसालादेखील धक्का लागणार नाही, याची सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

