भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
बौद्ध महासभा तालुका कार्यकारिणी जाहीर
अनुभवी अन् युवा ऊर्जेचा संगम ; सामाजिक–शैक्षणिक उपक्रमांना गती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : तालुक्यातील संघटनात्मक चळवळीला नवे नेतृत्व लाभले असून, भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी तालुक्याची २१ सदस्यीय नवी कार्यकारिणी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. ज्येष्ठ अनुभवी आणि युवा ऊर्जा यांचा संगम असलेली ही कार्यकारिणी आगामी काळात तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांना गती देणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुकाध्यक्षपदी सुनील पवार, सरचिटणीसपदी सिद्धार्थ जाधव तर कोषाध्यक्षपदी तुषार जाधव, उपाध्यक्ष (संस्कार) प्रीतम सावंत, (पर्यटन प्रचार) राहुल पवार, (संरक्षण) राजेंद्र पवार यांच्यासह विविध विभागांसाठी सचिव, संघटक व इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये हिशोब तपासणीस नंदकुमार यादव, कार्यालयीन सचिव सुरेश कांबळे, सचिव ः (संस्कार) राजेंद्र कांबळे व स्वप्नील पवार, (पर्यटन) आदेश कांबळे व अशोक यादव तर (संरक्षण) संदीप पवार व प्रमोद जाधव. संघटक ः संदेश पवार, राहुल जाधव, जितेंद्र सावंत, सुरेश जाधव, दिलीप वासनिक, सुभाष कदम आणि सुधीर जाधव.
नवीन कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचा समतोल साधण्यात आला आहे. अनेक पदाधिकारी संस्थेच्या विविध प्रशिक्षण शिबिरांमधून प्रशिक्षित झालेले आहेत. त्यामुळे संघटनात्मक शिस्त, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या कार्यकारिणीच्या कामकाजात दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस कदम, कोषाध्यक्ष प्रदीप जाधव, हिशोब तपासणीस सुनील पवार, कार्यालयीन सचिव विजय कांबळे तसेच संघटक तानाजी कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
---
कोट...
रत्नागिरी तालुक्याची नवनियुक्त कार्यकारिणी ही ज्येष्ठ अनुभव आणि युवा ऊर्जा यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. संस्थेच्या विविध प्रशिक्षणांतून तयार झालेले हे कार्यकर्ते संघटनेच्या ध्येयधोरण व नियमावलीला अनुसरून शिस्तबद्ध आणि परिणामकारक कामकाज करतील.
-एन. बी. कदम, जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

