सावंतवाडीत योग केंद्र उभारणार

सावंतवाडीत योग केंद्र उभारणार

Published on

सावंतवाडीत योग केंद्र उभारणार

अनिल निरवडेकर : पतंजली योग वर्गाचा वर्धापन दिन


सावंतवाडी, ता. २१ : नगरपालिकेतर्फे शहरात लवकरच अद्ययावत योगकेंद्र उभारले जाईल, अशी घोषणा प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नुकतीच पतंजलीच्या कार्यक्रमात केली.
येथील पतंजली योग परिवाराच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या स्थायी योग वर्गाचा २० वा वर्धापन दिन सोहळा नुकताच वैश्यभवन येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित पाचदिवसीय समग्र योगोपचार शिबिराचीही सांगता करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. वैश्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला ८० हून अधिक योगसाधकांनी उपस्थिती लावली होती.
व्यासपीठावर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे, वैश्यभवनचे संचालक रमेश बोंद्रे, जिल्हा पूर्वप्रभारी महेश भाट, बाळ बोर्डेकर, विकास गोवेकर, जिल्हा महामंत्री विकास केरकर, रवींद्र पावसकर, बाबली गवंडे, निर्मलाताई कडोलकर आदी उपस्थित होते.
ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, ‘गेली २० वर्षे पतंजली परिवार ही योगचळवळ निस्वार्थपणे चालवत आहे. याची दखल घेऊन नगरपरिषद दीड ते दोन वर्षांत अद्ययावत योगकेंद्र उभारणार आहे. हे केंद्र भविष्यातील सर्व योगशिबिरांसाठी हक्काची जागा म्हणून उपलब्ध करून दिले जाईल.’’
‘जर प्रत्येक प्रभागात जागा उपलब्ध करून दिली, तर पतंजलीतर्फे सर्व नागरिकांसाठी मोफत योगवर्ग घेण्याची आमची तयारी आहे,’ अशी ग्वाही जिल्हा प्रभारी पाटणकर यांनी दिली. डॉ. रावराणे यांनी साधकांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर विकास गोवेकर यांनी योगशिक्षकांना प्राणायामावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात संजय म्हापसेकर, डॉ. रोहिणी बांदेकर, डॉ. प्रशांत परब, योगेश येरम, स्नेहल कडोलकर, प्रमोद नाईक, तातू नवार, नंदादीप केळूसकर, रामकृष्ण धुरी, नारायण राणे, दत्तारामकाका सडेकर, दिलीप भाईप, बंड्या सुकी, गोविंद सावंत उपस्थित होते. गोवेकर यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल कडोलकर यांनी सूत्रसंचालन केले. बाबली गवंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com