इन्सुलीत शिवजयंती उत्साहात

इन्सुलीत शिवजयंती उत्साहात

Published on

26168


इन्सुलीत शिवजयंती उत्साहात
बांदा, ता. २१ : इन्सुली येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यनिमित्ताने इन्सुली येथील शिवप्रेमींनी इन्सुली, डोबाशेळ येथून दुचाकी फेरी काढली, तर सर्व शिवप्रेमींनी गावठण येथे एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
यात समूहगीत आणि शिवजन्म सोहळा सादर करण्यात आला. यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदा राणे, तारामती नाईक व मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळकरी मुलांनी केलेले सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरले.
इन्सुली गावठणवाडी येथील शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने हजारो शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. गुरुवारी (ता. १९) सकाळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्‍घाटन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे, सचिव रामचंद्र चराटकर, माजी सरपंच बाळू मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य आरती परब, कृष्णा सावंत, व्हा.चेअरमन दीपक इन्सुलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वृषाल पोपकर, फिलिप्स रॉड्रीग्ज, उल्हास सावंत, हरी तारी, दिनेश मुळीक, पोलिसपाटील जागृती गावडे, क्षेत्रफळ पोलिसपाटील प्रिया कोठावळे, विद्या विकास मंडळचे संचालक अजय कोठावळे, खजिनदार सदा कोलगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी दिलीप कोठावळे, जिल्हा परिषद सदस्य राऊळ, पंचायत समिती सदस्य राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सचिन पालव यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्यांचा शिवप्रेमींतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जय भवानी कला, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी उशिरा डोंगरपाल येथील दशावतार नाट्य मंडळांचा दशावतारी नाट्यप्रयोग झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com