सागरी महामार्ग दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको

सागरी महामार्ग दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको

Published on

26169

सागरी महामार्ग दुरुस्ती
न झाल्यास ‘रास्ता रोको’

म्हापणवासीयांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २१ ः म्हापण ते वेंगुर्ले सागरी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण १५ दिवसांत न झाल्यास १ मार्चला सकाळी ९ पासून ग्रामस्थ व सर्वपक्षियांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांसह आमदार दीपक केसरकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, म्हापण गावातून रेडी रेवस सागरी महामार्ग जात असून या महामार्गावरील म्हापण बाजारपेठ ते वेंगुर्ले दरम्यानचा रस्ता मागील दोन वर्षांपासून खराब झाला आहे. त्यावरून प्रवास करणे त्रासदायक व धोकादायक बनले आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून केवळ आश्वासने दिली. मात्र, कोणतेही रस्त्याचे काम न झाल्याने तो वाहतुकीसाठी अजूनच खराब झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ म्हणून व्यथित आहोत. त्यामुळे १५ दिवसांत डांबरीकरण न झाल्यास १ मार्चला सकाळी ९ पासून रास्ता रोको आंदोलन करू. आंदोलनादरम्यान प्रवाशांची गैरसोय व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com