श्री भगवती देवीला आज लागणार रूपं
-rat२१p४.jpg-
P२६O२६१६३
रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवी मंदिरात शिमगोत्सवाच्या बैठकीला उपस्थित ट्रस्टी, कमिटी सदस्य व ग्रामस्थ.
-----------
‘श्री भगवती देवी’ला आज लागणार रूपं
रत्नदुर्ग किल्ल्यावर उत्सवाची रंगत ; बैठकीत शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवस्थानच्या शिमगोत्सवाची रूपरेषा बैठकीमध्ये ठरवण्यात आली. या बैठकीला देवस्थानचे ट्रस्टी, कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीचा उत्सव रविवारपासून (ता. २२) देवीला रूपे चढवून सुरू होईल. त्यानंतर निशाणी काठी उभी करण्यात येईल. मांडवीतील सुदेश मायनाक यांच्याकडे देवीची होळी नेमण्यात आली आहे.
देवीची पालखी नसते तर मुलाला भगवतीचा अंश चढवण्यात येतो. या सजवलेल्या मुलासह म्हणजे देवीसह होळी तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. देवी उत्सवात रविवारी दुपारी तीन वाजता श्री देवी भगवती मंदिर येथून निघून भागेश्वर मंदिरमार्गे, राममंदिर, श्री देव भैरव याला हातभेट नारळ दिला जाईल. त्यानंतर मुरलीधर मंदिरमार्गे, झाडगाव नाकामार्गे जोगेश्वरी मंदिरामध्ये हात भेट देऊन तेथून झाडगांव नाकामार्गे, गाडीतळमार्गे, श्री देवी नवलाई-पावणाई मंदिरामध्ये हातभेट घेऊन रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथील श्री देव महापुरुष मंदिराला भेट देऊन तेथे गाऱ्हाणे घालून वरीलमार्गे परत ८ वाजता श्री भगवती देवी मंदिर येथे येईल.
उत्सवात २ मार्चला होळी श्री भगवती देवी मंदिर (किल्ले रत्नागिरी) येथून दुपारी १.३० वा. निघेल. भागेश्वर मंदिर, राममंदिर, मांडवी बंदरमार्गे, नेने वकील यांच्या घराजवळून सुदेश मायनाक (मांडवी) यांच्या घरी जाईल. तेथून होळी तोडून भुतेनाकामार्गे मुरलीधर मंदिर जागेत जाईल. तेथून होळी तोडून परत भैरी मंदिरमार्गे मुरलीधर मंदिरमार्गे, सुभेदार नाका (चरकरवाडी) भैरव मंदिर/चरकर होळ देवमार्गे, राममंदिरमार्गे भागेश्वर मंदिरमार्गे श्री भगवती मंदिर येथे ११ वा. येईल. त्यानंतर होम होईल.
-------
चौकट१
धुलिवंदन सोहळा
येत्या ३ मार्चला धुलिवंदन आहे. या दिवशी दुपारी १.३० वा. श्री भगवती मंदिर, भागेश्वर मंदिर, पेठकिल्ला, राममंदिर पेठकिल्ला, चरकर होळदेव, भैरव मंदिर, काँग्रेसभवन, टिळक आळीमार्गे, झाडगांव नाका (सावंत यांच्या घरी) जोगेश्वरी मंदिर तेथून काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, भैरव मंदिर, राममंदिर, भागेश्वर मंदिरमागे, भगवती मंदिर येथे येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

